Header Ads Widget

बरबडा ते वजीरगाव मार्गावरचे पूल तीन वर्षा नंतर पूर्ण होण्याच्या दिशेने - गुत्तेदारानी लावली शेवटी कसोटी -

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा ते वजीरगाव मार्गावरचे पूल तीन वर्षा नंतर पूर्ण होण्याच्या दिशेने  गुत्तेदारानी चांगलीच शेवटी कसोटी लावल्यामुळे सदरच्या पुलाचे जवळ पास पूर्ण होत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे

तालुक्यातील वजीरगाव ते बरबडा हे पूल शेतकऱ्यांसह जनतेच्या हितासाठी अतिशय महत्वाचे असल्यामुळे व बळेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे दर वर्षी येथील हनुमान मंदिरा पर्यत पाणी येत होते त्यावेळी शेतकरी पाण्यातुन शेताकडे पोहून जात होते

बरबडा ते वजीरगाव पूलाचे उदघाटन नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि सदरच्या गुत्तेदारानी तीन ते सहा महिन्यात पूर्ण काम करून देण्याचे सभेत अश्वासन दिले होते

या पुलाचे काम सन २०१९ साला पासून रखडले होते परंतु गुत्तेदाराच्या गतिमान यंत्रणा कामाला लागली असल्यामुळे सदरच्या पुलाचे काम अखेर पूर्ण काही दिवसात होईल अपेक्षा येथील नागरिकानी केली आहे 

Post a Comment

0 Comments