Header Ads Widget

मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या वेळेत मराठा आरक्षण द्या अन्यथा - आंदोलन छेडणार संतोष पाटील हिप्परगेकर यांचा तीव्र इशारा

        माधव पवार
 राज्यातले राज्य सरकार आणि राज्यकर्ते मराठा  समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जालना जिल्ह्याचे मनोज जरांगे पाटील मराठी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून आमरण उपोषण जवळ पास १७ दिवस केले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका महिन्याचा अवधी मागून घेऊन उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली आहे

सरकारच्या म्हण्या नुसार आमरण उपोषण मागे घेण्यात आले परंतु दिलेल्या वेळात मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा विशारा हिप्परगा येथील उपसरपंच संतोष पाटील कदम यांनी दिला आहे

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील वजीरगाव येथे हनमंत पाटील ढगे यांच्यासह तालुक्यातील हिप्परगा येथील सतीश पाटील कदम व गजानन पाटील कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी  हिप्परग्याचे सतीश पाटील नायगावच्या तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अमरण उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांना सरकारने आरक्षणाच्या बाबती मध्ये एक महिन्याचा वेळ मागितला आहे

मराठा समाजाला सदरच्या मागितलेल्या वेळे नुसार आरक्षण नाही मिळाल्यास परत एकदा राज्यात मराठ्यांचा आरक्षणासाठी तीव्र उद्रेक उठेल असं ही इशारा संतोष पाटील यांनी तीव्र शब्दात दिला आहे 

Post a Comment

0 Comments