राज्यातील तमाम मराठा बांधवांसाठी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या संघटनेत काम करीत असताना सन १९९५ ते ९६ सालापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा केला आहे
असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
गेल्या स्वतंत्र्याच्या काळा पासून मराठा समाज हा आरक्षणा पासून वंचित असल्यामुळे त्यांना आरक्षणाची अत्यंत गरज भासत असल्याने राज्यातले सरकार कोणत्या ही पक्षाचे असो मराठा समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष देऊन त्यांचा आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करील अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षक सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी व्यक्त केली आहे
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे सरकार कोणते ही सोडवण्याचा प्रयत्न केला नसल्यामुळे राज्यातील तमाम मराठा समाजाच्या भावना तीव्र होत असल्याने सरकारने या बाबीची गंभीर दखल घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणा बद्दलचा मुद्दा सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी मी एक समाजाचा घटक म्हणून सरकारकडे आरक्षणासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही सांगितले आहे

0 Comments