विशेष प्रतिनिधी : नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यातील एखंबा येथे शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका पन्नास वर्षीय महिलेच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी घडली आहे
या विभागामध्ये मेघ गर्जेनेसह पाऊस पडला असल्याने सदरची महिलाशेतातील एका झाडाच्या आश्रयाला बसली असल्यामुळे परंतु आकाशातून अचानक वीज कोसळल्याने सदरच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
तालुक्यातील एखंबा येथील रहिवासी असलेल्या अंदाजे पन्नास वर्षे महिला ही दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता वीज पडून मृत्यू पावली आहे
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा परिसरात अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटा मधील पाऊसात शेतात काम करणाऱ्या महिला शांताबाई पुंजाराम खंदारे या महिलेवर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
हिमायतनगर तालुक्याचे तहसीलदार आदित्य शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी चव्हाण यांनी सदरील दुर्दैवी घटनेचा पंचनामा करून प्रार्थमिक अहवाल शासनाकडे पाठवला असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे
सदरील घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती तात्पुरत्या स्वरूपात प्राप्त झाली असल्यामुळे अधिकची माहिती नायगाव फास्ट न्यूज हिमायतनगरचे विशेष तालुका प्रतिनिधी यांनी घेण्याचा प्रयत्न करीत असून काही वेळातच पूर्ण माहिती येण्याची शक्यता ? आहे

0 Comments