नायगाव तालुक्यासह व ग्रामीण भागात आणि खेड्यापाड्यात ग्रामीण पाणी पुरवठा नायगाव यांच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या गेल्या अनेक वर्षा पासूनच्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे ते टाक्या अर्धवट अवस्थेत असल्या तरी सदरच्या टाक्यावर गवत वाढत असल्याचे वास्तव दिसून येत आहेत
तालुक्यातील एकूण ८९ गावा पैकी काही गावांमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्फत लाखो रुपयाच्या योजना देण्यात आल्या परंतु नायगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मात्र कार्यालया मध्येच बसून कामकाज करीत असतात परंतु कोणत्या गावात किती टाक्याचे काम पूर्ण झाले हे मात्र चौकशी करण्यासाठी त्याला वेळ नसतो असे ही सदरच्या जनतेतून बोलला जात आहे
गावागावात गेल्या दहा ते पंधरा वर्षाखाली बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा टाक्याचे काम अद्याप अर्धवट असल्याने सध्याच्या परिस्थिती मध्ये त्या टाक्यावर हिरवेगार गवत वाढत असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागातील टाक्यावर दिसून येत असून सदरच्या अधिकाऱ्यांनी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या अर्धवट कामे चालू करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयांना सूचना द्यावेत अशा संदर्भात खेड्या पाड्यातील जनसामान्य माणसातून मागणी होत आहे
प्रशासन एका बाजूने गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून एकीकडे लाखो रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग नायगाव येथील अधिकाऱ्याच्या बेजारबाबदारपणामुळे ग्रामीण भागात कोणत्या ही खेड्यापाड्यांमध्ये शासनाच्या योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी नागरिकांना मिळत नाही असे चित्र वास्तव दिसून आहे

0 Comments