Header Ads Widget

भयभीत झालेला राजकीय पुढारी " अन " एक विकलेला पत्रकार आणि आरक्षणासाठी उपोषण करून व्याकुळ झालेला एक समाज - सतीश पाटील कदम यांचे मत !!

         माधव पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेत्याचा एकमेकाला ताळमेळ लागत नसल्याने राज्याची बिकट अवस्था होताना दिसत असताना व एकीकडे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे भयभीत झालेला राजकीय पुढारी आणि एक विकलेला पत्रकार हा भविष्यात नूतन पिढीसाठी घातक असल्याचे मत सतीश पाटील कदम यांनी त्यांच्या भावना प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे 

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शेड खाली बसलेला मराठा समाज याकडे कोणाचे ही लक्ष नसल्यामुळे सदरच्या भावी पिढीला घातक असल्याचे सतीश पाटील कदम हिप्परगेकर यांच्या अमरण उपोषणाच्या दरम्यान अनुभवलेला प्रसंग सांगितला सामाजिक कार्यकर्ता सतीश पाटील यांनी सांगितला आहे

पत्रकार क्षेत्रात काही निर्भीड पत्रकार सोडले तर बहुतांश पत्रकार चंद्रकांत बावनकुळे यांच्या भाषेतील नक्कीच आहेत आणि हे वास्तव चित्र आहे 

मराठा आरक्षणावर लवकरच शासनाने निर्णय घ्यावा एक तर मराठा समाजालाओबीसी मधून आरक्षण देऊन कुणबी प्रमाणत देण्यात यावे अथवा केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्केच्या वर न्यावी या दोन भूमिकेतच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणे गरजेचे आहे

आज घडीला प्रत्येक पक्षातील नेते याचे भांडवल करताना दिसत आहेत,मराठा समाज प्रत्येक नेत्यांना टार्गेट करत आहे मग तो कोणत्या ही पक्षाचा असो, तत्कालीन व चालू सत्तेत असणारे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत मला विरोध केलेले कार्यकर्ते याच पक्षाचे आहेत

पण नेत्यांना एकच सांगू इच्छितो मराठा समाज आता जागा झालेला आहे राजकीय जोडे बाजूला सारून खंबीर उभा आहे  त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पक्षाला यापुढे विरोध नक्कीच होणार आहे आता मराठा समाजाचा मोर्चा नेत्याकडे वळला आहे

कारण आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच आहात, मनी पॉवर च्या जोरावर्ती मते घ्यायची आणि समाजाला प्रश्नावर गाफील राहायचं हे आता चालणार नाही असे मत ही सतीश पाटील यांनी व्यक्त केले आहे 




Post a Comment

0 Comments