नायगाव तालुक्यातील रुई बु येथे चालत असलेल्या नाली बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावचे उपअभियंता बारसकर यांनी तात्काळ मार्काऊट देतील का ? प्रश्न रुई बु येथील नागरिकात पडला असून या विभागाचे शाखा अभियंता सिद्धीकी यांच्या मनमानी कारभारामुळे सदरच्या सी सी रस्त्याचे कधी बंद तर चालू होत आहे
तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्याचे काम करीत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कधी गुत्तेदाराला गजाळी टाकण्यास सांगतो तर कधी गजाळी सीसी रस्त्याच्या बांधकामात टाकण्यासाठी मनाई करतो तर सदरच्या रस्त्याच्या कामावर गुत्तेदाराची पूर्ण यंत्रणा असून या कामाच्या बाजूने शाखा अभियंता सिद्धीकी यांनी संटर मधून २५ फुटावर नाली काढा म्हणून सांगितले नंतर असे सांगितले की ४० फुटावर नाली बांधकाम करा म्हणून सांगितले आहे
रुई बु येथे करण्यात येत असलेल्या सीसी रस्त्याचे काम शाखा अभियंता सिद्धी की यांच्या बेजबाबदार पणामुळे महत्वाच्या ठिकाणी मेनकापड सुद्धा टाकण्यात आले नसल्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत याच विभागाचे शाखा अभियंता एस टी भगत तसेच अभियांत्रिकी सहाय्यक राठोड यांनी कामाची पाहणी केली असता सीसी रस्ता १९ सेंटीमीटर ऐवजी २३ सेंटीमीटर करण्यात येत असल्याचे सदरच्या अधिकाऱ्यानी सांगितले आहे
रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली बांधकाम असताना सुद्धा सदरचा शाखा अभियंता मार्काऊट दिले नसल्यामुळे स्वतः सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता बारसकर यांनी जास्तीचे लक्ष देऊन नाली बांधकाम करण्यासाठी मार्काऊट द्यावेत व शासनाचा कर्मचारी कामावर ठेवावे अशी मागणी गावकऱ्यातुन होत आहे

0 Comments