नायगाव तालुक्यातील एकूण ८९ गावे आहेत आणि या गावाला पुरेसे तलाठी नसल्यामुळे व एका तलाठ्याकडे दोन ते तीन व चार गावे असल्याने नेमवून दिलेल्या गावांत वेळेवर जाणे व येणे होत नसल्यामुळे गावातील शेतकऱ्याचे कामे मोठया प्रमाणात रेंगाळत आहेत
त्यासाठी नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी तलाठ्याना मुक्कामी राहण्याचे आदेश द्यावे असे निवेदन छावा संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे
तालुक्यातील सर्व तलाठी कर्मचाऱ्यांनी आपापल्या सज्जा ला मुक्कामी राहावे सज्जाला न राहिल्या मुळे शेतकरी वर्गाला संकटाना सामोरे जावे लागत आहेत तरी सर्वाना आपल्या मार्फत सूचना देऊन सज्जाला मुक्कामी राहण्याचे आदेश द्यावे अन्यथा मुक्कामी न राहिल्यास तहसील कार्याल्यावर छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल
असे निवेदन छावा तर्फे देण्यात आले निवेदनावर साई पाटील मोरे प्रताप पाटील कदम रावसाहेब पाटील शिंदे हणमंत पाटील शिंदे चंद्रकांत पाटील होटाळकर बंटी पाटील शिंदे अजिंक्य पाटील कल्याण रितेश पाटील कल्याण गजानन पाटील कदम सतीश पाटील कदम आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

0 Comments