Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेससाठी अंकुश पाटील रातोळीकर यांची निवड

        माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून अंकुश चंद्रभान पाटील रातोळीकर यांची नुकतीच निवड करण्यात आली असून येणाऱ्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली सदरची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे

अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी दिली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नायगाव विधानसभा मतदारसघ अध्यक्ष पदी अंकुश चंद्रभान पाटील रातोळीकर यांची दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी नांदेड येथे नियुक्ती करण्यात आली आहे

यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष व विद्यमान नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली आहे

यावेळी भगवानराव पाटील आलेगावकर भाऊसाहेब घोरठेकर प्राध्यापक डी बी जाबंरूनकर,डॉ परशुराम वरपडे,शुभाष गायकवाड,गजानन पांपटवार,शिवाजीराव जाधव विश्वनाथ बडूरे डॉ.मनोहर रातोळीकर शंकरराव मोरे,राहुल पाटील,विनायक पाटील माहेगावकर,राजेश पाटील,संतोष पांचाळ व आदी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments