Header Ads Widget

पाटोद्याच्या कर्ज बाजारी शेतकऱ्याची आत्महत्या कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना -

               माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटोदा ( त. ब ) येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने कौलारू घराच्या तूळईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे

या सदरील घटनेची माहिती कुंटूर पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बिटचे ए एस आय रमेशराव निकाते यांच्यासह पॉ. का. स्वप्नील हंबर्डे यांनी घटना स्थळी रवाना झाले आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटोदा येथे कर्ज बाजारी शेतकरी ज्ञानेश्वर माधवराव शिंदे वय ३३ वर्ष यांनी आपल्याच घरी तूळईला गळ फास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे

बरबडा बीटचे ए एस आय रमेशराव निकते यांच्यासह पॉ. का स्वप्निल हंबर्डे यांनी सदरील घटनेचा पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले व शेवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बरबडा येथे पीएम करण्यात आले अशी माहिती ए एस आय रमेशराव निकाते यांनी दिली आहे
 
कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पाटोदा येथे सदरच्या शेतकऱ्यांनी सततच्या नापिक व कर्ज बाजारीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते वैद्यकीय अधिकारी यांनी शेवविच्छेदन झाल्याच्या नंतर सदरचे प्रेत पोलिसानी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याच्या नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे 

Post a Comment

0 Comments