Header Ads Widget

भाजपाच्या नायगाव शहर अध्यक्ष पदी माधव कल्याण यांची निवड

         माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षाचे काम करणारे नायगाव येथील माधव शंकरराव पाटील कल्याण यांची भारतीय जनता पार्टीचे दक्षिणचे जिल्हाध्याक्ष संतुकराव हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच भाजपाच्या नायागांव शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे

येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा त्याच बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या निवडी नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या शिफारसी नुसार करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना छोटे मोठे पद बहाल करण्यात येत आहेत

सदरच्या निवडणुकी दरम्यान आपापले कार्यकर्ते आपल्या सोबत राहवे म्हणून भाजपा पक्षाच्या माध्यमातून सदरच्या निवडी भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असल्याचे व नियुक्ती पत्र देण्यात येत असल्याचे सदरच्या भाजपा कार्यकर्त्यातून सांगितले जात आहे 

Post a Comment

0 Comments