Header Ads Widget

बरबड्यात आईचा खून करून फरार झालेल्या आरोपी मुलास भोकर तालुक्यातील भोसी येथून कुंटूर पोलिसांनी १२ तासाच्या आत ठोकल्या बिड्या -

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बरबडा येथे एका ६० ते ६५ वर्षीय आईच्या डोक्यात खलबत्ता घालून खून करणाऱ्या व फरार असलेल्या आरोपी मुलाला बारा तासाच्या आत कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल एन बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आटकोरे ए एस आय नागोराव पोले व अभिजीत पाटील आईचा खून करणाऱ्या मुलाला दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी जेरबंद केले आहे

नायगाव तालुक्यातील बरबड्यात आईचा खून करून फरार झालेल्या आरोपी मुलास भोकर तालुक्यातील भोसी येथून कुंटूर पोलिसांनी १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे 

बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांच्या आदेशानुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय आटकोरे यांच्यासह एएसआय नागोराव पोले व अभिजीत पाटील यांनी भोकर तालुक्यातील भोसी येथून जेरबंद केल्याची माहिती दिली असून मयतांचा पती लिंगोजी वटपलवाड यांच्या तक्रारी वरून आरोपी मुला विरोधात ३०२ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे

तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेली मयत गोदावरीबाई लिंगोजी वटपलवाड हिचा मुलगा श्रीनिवास लिंगोजी वटपलवाड हा माईंड फॅक्ट असल्याचे सांगण्यात येत होते यांनी दिनांक २३ सप्टेंबर २०२३  रोजी दोन तीन वाजण्याच्या दरम्यान स्वतःच्या आईच्या डोक्यात खलबत घालून खून केला असल्याची चर्चा मोठया प्रमाणात बरबडा येथे होती कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे यांनी तपासाचे चक्रे जलद गतीने फिरवुन खुनी मुलांना बेड्या ठोकल्या आहेत

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय आटकोरे एएसआय नागोराव पोले यांच्यासह अभिजीत पाटील यांनी आईचा खून करून फरार असणाऱ्या आरोपी मुलाला १२ तासाच्या आत भोकर तालुक्यातील भोसी येथे रस्त्याने फिरताना व पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून जाग्यावरच जेरबंद करून कुंटूर पोलीस ठाण्यात त्यांना हजर करण्यात आले व पुढील तपास सपोनि बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कुसमे हे करीत आहेत 




Post a Comment

0 Comments