Header Ads Widget

पतीचा मृत्यू डोळ्याने पाहताच पत्नीने ही प्राण सोडले देगलूर तालुक्यातील वळग येथील घटना

नायगाव फास्ट न्यूज - नेटवर्क -

देगलूर तालुका वळग येथील बेलदार समाजातील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर चंदावाड यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी पत्नी सौ.अंजनबाई चंदावाड यांना कळताच त्या सुद्धा प्राण सोडल्याची घटना घडल्याने पती-पत्नीच्या अतूट प्रेमाचा अप्रत्यक्ष अनुभव पाहायला मिळाल्याने कलियुगात सती जाण्याचा प्रत्येय आल्याचे  बोलल्या जात आहे.

दिनांक १९ सप्टेंबर रोजी गंगाधरराव चंदावाड यांचे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ७९ वर्षाचे होते. ही बातमी पत्नी सौ. अंजनबाई यांना कळताच पतीच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने दिनांक २० सप्टेंबर रोजी सौ.अंजनबाई चंदावाड  यांनी अखेरचा श्वास घेतला आहे 

गंगाधर चंदावाड व सौ अंजनबाई चंदावाड यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी मौजे वळग येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्ययात्रेला हजारो जनसमुदाय पाहता  पती व पत्नीच्या एकमेकांबद्ल असलेल्या अतूट नात्याची साक्ष पहायला मिळाले. अनेक दिवस, वळग गावाच्याच नव्हे तर, परिसरातील जनतेच्या कायम आठवणीत राहणारा हा प्रसंग होता.
   
पती जीव सोडले म्हणून, पत्नीच्या मनावर आघात झाला, आणि पत्नीने प्राण सोडले. हा योगायोग नसून, हे त्यांच्यात असलेल्या निसिम प्रेमाच्या नात्याचे प्रतीक आहे.  अशा घटना अपवादात्मक घडतात.त्यांच्या पच्यात ३ मुले,१ मुलगी , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments