हिमायतनगर : नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यात सन २२ व तसेच २०२३ या दोन्ही वर्षात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले या नुकसानी बरोबरच घरांची पडझड ही मोठ्याप्रमाणात झाली आहे
शासनाकडून पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाच्या मदतीची अपेक्षा लाभधारक करीत आहेत. परंतू प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन वर्षापासून घरपडीचे अनुदान लाभधारकांच्या पदरात पडले नाही. या बाबींकडे मा. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठन मिडीया प्रभारी जिल्हाध्यक्ष नागोराव शिंदे पळसपूरकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की, सन २२ ला या भागात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने खरीपाच्या पेरणीतील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. आणी अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे
अनेकांची स्वतःची घरे भुईसपाट झाल्याने, अनेकांचे संसार उघड्यावर आले. शासनाकडून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पंचनामे करण्यात आले. पंचनाम्या नंतर तात्काळ शासनाची मदत पदरात पडेल ? अशी आशा लाभधारक व्यक्त करीत होते. परंतू गेल्या वर्षीच्या अनूदानाची रक्कम लाभधारकांना मिळाली नाही. अनुदानाच्या प्रतिक्षेत वर्षे निघून गेले आहे
दुसर्या वर्षीचा पावसाळा येवून ठेपला, २०२३ लाही अतिवृष्टी झाली. यावर्षीही अनेकांची घरे पडून नुकसान झाले. पंचनामे ही झाले. परंतू यावर्षीची रक्कम ही लाभधारकांना अद्यापपर्यंत मिळाली नाही. या गंभीर बाबींकडे जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ लक्ष घालून घरपडीच्या अनुदानाची रक्कम थेट लाभधारकांच्या बॅक खात्यावर जमा करावी. अशी मागणी नागोराव शिंदे यांनी निवेदन देऊन केली आहे.

0 Comments