Header Ads Widget

खुजड्याच्या शेतकऱ्याचा सार्थ अभिमान वाटतो कवळे गुरुजी यांचे मत

         माधव पवार
शेतकरी नेते कवळे गुरुजी म्हणतात - नांदेड जिल्हातल्या मुदखेड तालुक्यातील मौजे खुजडा येथील शेतकरी गोविंदराव मोहनराव पाटील कुरे यांना केवळ २० एकर जमीन असताना सुद्धा हा शेतकरी पुर्ण ऊस लागवड करून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतोय त्यांच्या कडे १० जनावरं आहे
तो दिवसा गणिक १५० लिटर दूध उत्पादीत करतो आपण सुध्दा त्यांचा आदर्श घेऊन शेती करावे असे सांगत ते पुढे म्हणाले सदरच्या शेतकऱ्याचा स्वार्थ अभिमान मला वाटत आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी उमरी धर्माबाद नायगांव बिलोली भोकर आदी तालुक्यात जावून शेतक-यांना प्रोत्साहन पर भाषणाच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्याचे काम शेतकरी नेते हे करीत आहेत 

शेतकरी नेते गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रत्येक शेतकरी शेती पूरक दुग्ध व्यवसाय जोड धंदा म्हणून  केला तर नक्की त्यांची प्रगतीसह उन्नती होऊ शकते असे ही कवळे गुरुजी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे 

मा.कवळे गुरुजी पुढे बोलताना म्हणले की आपण सुद्धा इतरत्र आपला अमूल्य वेळ खर्च न करता स्वतःच्या पायावर सक्षम पणे उभे राहण्यासाठी शेतकऱ्यानी जास्तीचे प्रयत्न करावेत असे आहवान कवळे गुरुजी यांनी केले यांनी केले आहे 

खुजडा गोविंदराव मोहनराव कुरे यांच्या कडे २० एकर जमीन असून हा शेतकरी पुर्ण उस लागवड करत आहे आणि विशेष म्हणजे जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतोय आज त्यांच्या कडे १० जनावरं असून तो दिवसागणिक १५० लिटर दूध उत्पादीत करतो आपण सुध्दा त्यांचा आदर्श घेऊन शेती करावी असे कवळे गुरुजी म्हणाले आहे 







Post a Comment

0 Comments