Header Ads Widget

राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी कवळे गुरुजी यांची तळमळ -

माधव पवार
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे हे कनिष्ठपणे काम करणारे व राजकारणा बरोबर शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत तळमळ करणारे उमरी येथील कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो अशा मन मिळवून नेतृत्वाच्या पाठीमागे असंख्य शेतकरी ताठर पणाने उभे आहेत

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे अतिशय जवळचे मानला जाणारा एक शेतकरी पुढारी म्हणून व राजकीयअस्तित्व टिकून ठेवलेले शेतकऱ्यांचे नेते कवळे गुरुजी गेले उन्हाळ्याची चार महिने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या संदर्भातील अडी अडचणी जाणून घेऊन अडचणीवर मात करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घाटी घेतल्या आहेत

राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी व आपल्या भागातील सर्व शेतकरी शेतमजुर व बेरोजगार सर्वसामान्य नागरीकाच्या आर्थिक दृष्ट्या मजबूत झाल्या पाहिजे या डोळस विचारातून संकल्पनेतून कवळे गुरुजी यांनी देशात व परदेशात अनेक अभ्यास दौरे केले व्हि. पी. के उद्योग समूहाची स्थापना करून शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठी चळवळ चालू केली आहे

Post a Comment

0 Comments