Header Ads Widget

भोकरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेशात पक्षाचेप्रदेश चिटणीस वसंत पाटील सुगावे यांचा विशेष सन्मान

          माधव पवार 
नांदेड जिल्हाच्या भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या सोहळ्यात नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेश चिटणीस
वसंत पाटील सुगावे यांचा मान्य वरांच्या उपस्थितीत फेटा बांधून सन्मान करण्यात आला आहे

जिल्हाच्या भोकर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची चर्चा असून तालुक्यातील घुंगराळा नगरीचे भूमिपुत्र तथा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस वसंत संभाजीराव पाटील सुगावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस साथ आज पर्यत सोडली नाही पक्षावर ज्यावेळी संकट आले होते त्यावेळी एकमेव ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पक्षाचे काम करीत राहिले होते 

सन २०१४ व २०१९ वर्षाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्ज नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता परंतु तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी एकमेव कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले राष्ट्रवादी काँग्रेसचे गटबाजी झाली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटाकडे गेले असल्यामुळे भोकरच्या पक्ष प्रवेशा दरम्यान वसंत पाटील सुगावे यांचा सन्मान करण्यात आला आहे 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस वसंत पाटील पाटील यांचे भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष मा.इंजी विश्वंभर पवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments