हिमायतनगर. :- नागोराव शिंदे -
तालुक्यातील मौजे पारवा बुद्रुक येथील एका घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने पाच जन गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दि. १६ रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली आहे.
जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड ला हलविण्यात आले होते. जखमींपैकी पती, पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पारवा बु. येथील माने कुटुंबातील सदस्य एकत्र असताना दि. १६ सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक घरातील गॅसचा अचानक स्फोट झाला.
या दुर्घटनेत घरातील बालाजी भीमराव माने वय ४५, राधाबाई बालाजी माने वय ४०, गजानन बालाजी माने वय २०मोनिका बालाजी माने वय १८, वछलाबाई भीमराव माने वय ५८ हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक स्वरूपात गॅसचा स्फोट झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी स्फोटाचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सर्वांना नांदेड येथील विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात होते. उपचारादरम्यान दि. १७ रविवार सकाळी सात वाजताच्या दरम्यान बालाजी भीमराव माने वय ४५ वर्ष, पत्नी राधाबाई बालाजी माने वय ४० वर्ष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
घटनेची माहीती प्राप्त होताच पारवा गावावर शोक कळा पसरली असून रात्री उशीरा मयत पती पत्नीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार आले आहेत.

0 Comments