नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी. आपल्या भागातील शेतकरी, शेतमजुर व बेरोजगार सर्वसामान्य नागरीक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहीजे या हेतुने देशात व परदेशात अनेक अभ्यास दौरे करुन *मारोतराव कवळे गुरुजी* यांनी व्हि. पी. के उद्योग समूहाची स्थापना केली आहे.
कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगरशेती सहकारी पतसंस्था -
कवळे गुरूजीनी प्रथमतः व्हि.पी. के उद्योग समुहातील महत्वाची कडी असलेल्या कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगरशेती सहकारी पतसंस्थेची सुरुवात इ.स. २००२ साली सिंधी गावामध्ये शेतकरी व गावातील नागरिकांची बैठक घेऊन पतसंस्था स्थापन करण्याची भुमिका मांडली आणि सदरची संकल्पना गावातील सर्व नागरीकांना पटल्यानंतर त्या बैठकीत ५६ हजार ५०० रुपये भागभांडवल जमा करुन पतसंस्थेची सुरुवात केली. पतसंस्थेचे मार्च २०२३ अखेर ३२१९८ सभासद असून, अधिकृत भागभांडवल दोन कोटी आहे
तर वसुल भागभांडवल रु. १.९६ कोटी आहे. पतसंस्थेच्या ठेवी मार्च २०२३ अखेर रक्कम रु.१८९.४५ कोटी इतक्या आहेत. पतसंस्थेने मुदती कर्ज, प्रॉपर्टी कर्ज, शेतकरी व व्यापारी याना मालतारण कर्ज, दुधाळ जनावर खरेदीसाठी कर्ज, सोने तारण कर्ज मार्च २०२३ अखेर पतसंस्थेने रक्कम रु.१५७.०९ वाटप केले आहे.
पतसंस्था दिलेले कर्जे वसुल करणेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून प्रभावीपणे हितचतिक व दैनीक ठेवी प्रतीनिधी वसुली करते. मार्च २०२३ अखेर पतसंस्थेचा ढोबळ एनपीएचे प्रमाण २.६८ इतके असुन, नेट एनपीएचे प्रमाण शुन्य टक्के आहे. पतसंस्थेने मार्च २०२३ अखेर राष्ट्रीयकृत बँक व इतर बँकेत मुदत ठेवीमध्ये रक्कम रू. ५५.९७ कोटीची गुंतवणूक केली आहे. पतसंस्थेचा स्वनिधी रक्कम रु.७.३३ कोटी असुन, पतसंस्थेस 2022.23 या आर्थिक वर्षात रु. ४.९७ कोटी ढोबळ नफा झाला आहे
कायदेशीर तरतुदी वजा जाता रक्कम रु. 0.74 कोटी निव्वळ नफा झाला आहे. पतसंस्था स्थापना झाल्यापासून आजपर्यंत आपल्या सभासदांना 15% लाभांश देत आहे. पतसंस्था सभासद, ठेवीदार, कर्जदार, अल्पठेव प्रतिनिधी व कर्मचारी यांच्या विश्वासाने व संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे पतसंस्था रु. 347 कोटी रुपयाच्या व्यवसायापर्यंत पोहचली आहे.
पतसंस्थेच्या माध्यामातून ग्राहकांना कोअर बँकींग, क्यू आर कोड, आर.टी.जी.एस व एन.ई.एफ.टी. एस.एम.एस. सुवीधा व लॉकर्स सुवीधा देण्यात आल्या आहेत. त्या सोबतच शेतकऱ्यांना व व्यापारी बांधवाना धान्यतारण योजणेचा लाभ मिळावा म्हणुन पतसंस्थेच्या वतीने सुसज्ज वेअर हाऊस बांधुन त्यात ग्राहकांचे धान्य सुरक्षीत ठेऊन त्यावर धान्यतारण कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे व त्यासोबत सोने तारण, वाहन तारण कर्ज, मुदती ठेव पावती तारण कर्ज अशा अनेक सुविधा पतसंस्थे मार्फत पुरवल्या जात आहेत.
पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थीक गुंतवणुक करू इच्छीता त्या खातेदारास किंवा अन्य व्यक्तीस आकर्षक व्याजदराच्या अनेक ठेव योजना उपलब्ध आहेत, ज्यात मासीक ठेव योजना, लखपती ठेव योजना, दामदुप्पट ठेव योजना, आवर्त ठेव योजना आहेत ज्यात नागरीक आपली रक्कम गुंतवून मोठ्या प्रमाणात आर्थीक लाभ घेऊ शकतात.
ठेवीदारांना अर्थीक लाभ तर मिळतोच परंतु ठेवीदारांनी पतसंस्थेत गुंतवलेली ठेव रक्कम ही आपल्या भागातील गरजवंतांना कर्जापोटी वाटप होते. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोटार पाइपलाईन, ठिबकसिंचन, दूध व्यवसाय व जिल्हातील असंख्य बेरोजगार तरुणांना वेगवेगळे उद्योग उभारण्यासाठी कर्ज देऊन सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभा करण्याचे कार्य केले जाते. त्याचं सर्व श्रेय पतसंस्थेत ठेवरुपी गुंतवणूकदारांना जाते. कारण त्यांच्या ठेवीचा लाभ त्यांना स्वतःला तर मिळतोच परंतु ती रक्कम गरजू कर्जदारास मिळुन त्याचा संसार चालण्यास हातभार लागतो.
कवळे गुरुजी यांच्या दुरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार्य घेऊन नांदेड जिल्ह्यातील अनेक जन जीवन जगत असल्याचे असंख्य उदाहरणे जिल्ह्यात पहावयास मिळतात आणि जिल्हातील विविध महिला बचत गटांना लघु व गृह उद्योगासाठी अर्थसहाय्य करुन महीलांना सक्षम करण्याचे कार्य होत आहे व या पुढे देखील कवळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हि.पी. के पतसंस्थेच्या विस शाखेच्या माध्यमातून जिल्हाभरात हे कार्य चालु राहणार आहे..
पतसंस्थेने केवळ आर्थीक उलाढाल न करता आपण समाजाचे काही देणे लागतो या समर्पन भावनेने व्हिपिके उद्योग समुहा मार्फत सामुहीक विवाह सोहळा, आरोग्य शिबीरे, आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत, वृक्षारोपण व जलसंधारणाची कामे व या सारखे अनेक सामाजिक उपक्रम नांदेड जिल्हाभरात राबवल्या जातात. मराठवाड्यात सहकार क्षेत्रास प्रतिकुल परिस्थीती असतांना देखील कवळे गुरुजी यांनी नियोजीत व्यवस्थापन करुन सहकार क्षेत्रातील आपल्या सभासदांना 15 टक्के लाभांश देणारी एकमेव व्हि.पी. के पतसंस्था अबाधीत ठेवली आहे. सध्या पतसंस्थेच्या एकुण विस शाखा नांदेड जिल्ह्यात कार्यरत असुन त्या परीसरातील नागरीकांनी अधीकचा असलेला पैसा ठेव रुपाने गुंतवून आर्थीक लाभ घेणे प्रार्थनीय आहे.
*नांदेड जिल्हात त्यांचे असलेले तीन ऊस कारखाणे*
व्हि.पी. के उद्योग समुहाचे सध्यास्थितीत नायगाव मतदार संघातील उमरी तालुक्यात व्हि.पी. के उद्योग समुहाचे तीन ऊस प्रक्रीया उद्योगाचे कारखाने कार्यरत आहेत त्यात व्हि. पी. के अग्रो फूड प्रॉडक्ट प्रा. लि. प्रयागनगर सिंधी हा प्रती दिवस 800 मे. टन गाळप क्षमता असणारा गुळपावडर कारखाना ज्याची उभारणी इ.सन २०१७ या वर्षी करण्यात आली. सदर कारखाण्यात उत्पादीत झालेले गुळपावडर देशासह परदेशात देखील विक्री केल्या जातो यासोबतच उद्योग समुहातील दुसरा कारखाना एम. व्हि. के. अँगो फुड प्रॉडक्ट लि. कुसुमनगर वाघलवाडा हा साखर कारखाना ज्याची गाळप क्षमता प्रती दिन 2300 मे. टन प्रती दिवस असुन त्यात साखर उत्पादीत केल्या जाते. सदर कारखाना हा व्हि. पी. के उद्योग समूहाने इ. सन. 2020 मध्ये खरेदी करुन अल्पावधीत गाळपास सज्ज करून यशस्वी पणे चालवित आहे. व्हि.पी. के उद्योग समुहातील तिसरा ऊस प्रक्रीया उद्योग म्हणजे इ. सन 2022 मध्ये नवीन उभारण्यात आलेला डॉ. शंकरराव चव्हाण जॅगरी अँड अग्रो प्रॉडक्ट प्रा. लि. कुसुमनगर वाघलवाडा हा गुळपावडर कारखाना ज्याची गाळप क्षमता 1800 मे. टन प्रती दिवस आहे. या तीन कारखाण्याच्या माध्यमातुन 4500 बेरोजगारांना रोजगार निर्मीतीचे मोलाचे कार्य उद्योग समूहा मार्फत झाले आहे.
व्हि. पी. के उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव पा. कवळे गुरुजी यांनी अनेक अभ्यास दौरे करुण कारखाण्यांच्या स्थापनेचा निर्णय घेतला आहे त्याचे कारण असे की आपल्या महाराष्ट्रातील शेती क्षेत्रामध्ये अत्यंत प्रगती करुन पश्चीम महाराष्ट्र प्रगती पथावर गेला तेथील शेतकरी आर्थीक दृष्ट्या संपन्न झालेला आहे. याचा बारकाईने अभ्यास कवळे गुरुजी यांनी केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पश्चीम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी ऊस हे शाश्वत पिक आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात घेतात त्यात त्यांना शाश्वत पैसा मिळतो. त्यामुळे तेथील शेतकरी संपन्न झाला हे लक्षात घेऊन माझ्या भागातील शेतकरी देखील पश्चीम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे सुखी आणि संपन्न झाला पाहिजे या हेतुने उद्दोग समुहाचे चेअरमन मारोतराव पा. कवळे गुरुजी यांनी नायगांव मतदार संघात एक नाही तर तीन कारखाण्यांची स्थापणा करुन आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा प्रश्न सोडवून शेकऱ्यांना शाश्वत कारखाने उपलब्ध करुन दिले. व्हिपिके उद्योग समुहातील कारखाण्यांमध्ये इतर कारखाण्याप्रमाणे केवळ ऊस तोड करून त्याचे गाळप करून मोकळे व्हायचे इतकाच संकुचीत विचार न करता शेतकऱ्यांचे प्रती एकरी उत्पादन कसे वाढविता येईल याच्यावर जास्तीचा भर दिला आहे. त्या अनुषंगाणे कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये ऊस विकास चर्चासत्राचे आयोजन करुन स्वतः कारखान्याचे चेअरमन मारोतराव पा. कवळे गुरुजी यांच्या उपस्थीतीत कार्यक्रम पार पाडला जातो. ज्यात शेतकऱ्यांना ऊस व्यवस्थापना विषयी विस्तृत मार्गदर्शन तज्ञाद्वारे करण्यात येते. पश्चीम महाराष्ट्रातील शेतकऱ्यां प्रमाणे आपल्या भागातील शेतकरी देखील एकरी शंभर टन प्रती एकरी उत्पादन घेतला पाहिजे या हेतुने व्हि.पी. के उद्योग समूहा मार्फत वर्षातून दोन वेळा वसंत दादा शुगर इंस्टीट्यूट पुणे येथे शेतकऱ्यांना चार दिवसीय प्रशीक्षणासाठी पाठविल्या जाते. सदर प्रशीक्षणास मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळतो व प्रशिक्षण घेतलेले शेतकरी प्रत्यक्ष आपल्या शेतीत पारंपारीक शेतीला फाटा देत आधुनीक पध्दतीने ऊस व्यवस्थापन करुन आपल्या उत्पादनात वाढ करीत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शुध्द व दर्जेदार बेणे ऊस लागवडीस पुरवठा करण्यासाठी कुसुमनगर वाघलवाडा येथील कारखाना क्षेत्रात उती संवर्धीत रोपांपासून बेणेमळा तयार करुन त्यातील पायाभूत बेणे शेतकऱ्यांना वाटप केल्या जाते. त्यासोबतच कारखाण्याने सुसज्ज उस रोप वाटीका उभारुन त्यात तज्ञांच्या देखरेखी खाली उस रोप तयार करून निरोगी व दर्जेदार ऊस रोपे शेतकऱ्यांना उधारी तत्वावर वाटप करण्याचे नियोजन केले आहे.
ऊस लागवड करणाऱ्या शेतकयाच्या जमीनींचा पोट सुधारून जमीन सुपीक बनवण्याच्या उद्देशाने कारखाण्या मार्फत कारखाण्यातील मळीपासून गांडुळखत निर्मीतीचा प्रकल्प सुरु केला असुन त्याचे वाटप देखील शेतकऱ्यांना केल्या जात आहे पश्चीम महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणात आडसाली ऊसाची लागवड करतात त्यामुळे त्यांच्या ऊसाला वाढीसाठी सत्तरा ते अठरा महीने कालावधी मिळतो. त्याने ऊसाचे उत्पादन उच्चांकी येते परंतु मराठवाडयातील ऊस उत्पादक अजुन देखील आडसाली हंगामात ऊस लागवड करण्याकडे वळलेले नाहीत. म्हणून उद्योग समुहाचे अध्यक्ष कवळे गुरुजी यांनी आडसाली हंगामात ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास ऊस बेणे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने आता कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी आडसाली ऊस लागवडीकडे वळताना पाहवयास मिळत आहेत.
*उद्योग समुहातील तिसरी महत्वाची साई कृपा दुध डेअरी*
कवळे गुरुजी यांनी शेती पुरक जोड व्यवसाय असलेल्या दुध व्यवसायाची निवड केली कारण शेती मधून ऊसासारखा शाश्वत पिकाचा पैसा हा वर्षभराने शेतकऱ्यांस मिळतो आणि त्या शेतीस पूरक असणारा दूध व्यवसाय जर शेतकऱ्यांनी केला तर दर दहा दिवसाला दुधाचे पैसे शेतकऱ्यांस मिळतील आणि त्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा त्यातून भागतील, दूध व्यवसायातून ताजा पैसा शेतकऱ्यांना मिळतोच परंतु शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आलेला घटक म्हणजे शेतात ते मोठया प्रमाणात शेतकऱ्यास उपलब्ध होईल व जनावरांच्या मल-मुत्राचा वापर शेती मध्ये झाल्यास जमीनीचा शेंद्रीय कर्ब वाढून जमीन कसदार व सुपीक होऊन त्यातुन शेतकऱ्यास उच्चांकी उत्पादन घेता येईल.
उद्योग समूहातील साईकृपा डेअरीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावात दुध संकलन केंद्र स्थापण करुन दुध उत्पादकांना गावातच दुध विक्रीसाठी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. साईकृपा डेअरीच्या माध्यमातून दूध उत्पादकांसाठी आधुनीक दूध उत्पादनाबाबत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येते व दूध उत्पादकांना घेवून पश्चीम महाराष्ट्रात अभ्यास दौरे काढले जातात. ज्याचा फायदा दूध उत्पादकांना होवून दूध उत्पादनात वाढ होताना पाहवयास मिळते. साईकृपा डेअरीच्या माध्यमातुन मुल्यवर्धनासाठी दुधापासून दही, ताक, लस्सी, लोणी, पनीर, तुप, श्रीखंड, खवा, कुल्फी असे
अनेक पदार्थाची निर्मीती केली जाते अनेक शहरे व परीसरातील ग्रामीण भागात या पदार्थाची के गुरुजी या प्राडक्ट अंतर्गत विक्री केली जाते.
दूध उत्पादन व ऊस उत्पादन या दोनही गोष्टी एकमेकांशी साखळी प्रमाणे जुळुन असल्या मुळे शेतकऱ्यांनी याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे कारण दोनही शाश्वत उत्पादन देणाऱ्या उत्पादनांचे प्रक्रीया उद्योग आपल्या नजीक व्हि.पी. के उद्योग समुहात उपलब्ध आहेत म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसाय म्हणून दुध उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत करुन आर्थिक प्रगती
साधने प्रार्थनीय आहे.
*शिक्षण संस्था*
आपल्या मतदार संघातील शेतकरी, शेतमजुर व कर्मचारी यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळुन येणारी पीढ़ी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व्हावी या हेतुने ढोलउमरी, उमरी व वाघलवाडा येथील कारखाना क्षेत्रात शैक्षणीक संस्थांची उभारणी करुन विध्यार्थाच्या उज्वल भवितव्य घडविण्याचे काम उद्योग समुहा मार्फत केले जात आहेत.
नायगाव मतदार संघासह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेचा विकास करण्यासाठी मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी अभ्यासपूर्ण पध्दतीने उद्योग समुहाची रचना करून सर्वसामान्य शेतकरी व बेरोजगार तरुणांना स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी करीत असलेल्या परिश्रमाची जाणीव सर्व जनतेस आहे. तरी मतदार संघातील जनतेच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या उद्योग समुहातील वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेउन सकारात्मक दृष्ट्या विचार करून सर्व जनतेने विकासाची कास धरून आपली प्रगती साधावी अशी भावना व्हिपीके पतसंस्थेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज ताज पाटील हाँटेल नांदेड येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांनी केलेयावेळी व्हिपीके पतसंस्थेचे संचालक प्रभाकरराव पाटील पुयड, गणेशराव पाटील ढोलउमरीकर,के.वाय.रँपनवाड, अनिल आप्पा काचावार,जे.डी लापशेटवार, तसेच विश्वनाथ पाटील बन्नाळीकर जेष्ठ सल्लागार धर्माबाद, दत्ताहरी पाटील चोळाखेकर, संभाजीराव पाटील मांजरमकर, सुर्याजी पाटील चाडकर कूंटुर, शंकरराव पाटील कदम लगळुदकर,मामीडवार शावकार नायगांव,सय्यद हबीब दूलेसाब देगलूरकर, गंगाधर पाटील कल्याण, माधवराव देशाई बरबडेकर, भगवान पाटील चव्हाण नायगाव,प्रा.चिद्रावार सर, सुधाकर बावणे, केशवराव कल्याणकर,रवी शेट्टी धर्माबाद, गणपतराव पाटील हसेकर, लक्ष्मणराव पाटील हारेगांवकर,अँड.सावित्रीताई जोशी,सि.ए.भुतडा साहेब,मुस्तापुरे यासह संस्थेचे सचिव नागनाथ पांचाळ साहेब, सिईओ अण्णाराव पाटील, जनरल मॅनेजर एन.इंगोले साहेब सह असंख्य सभासद ठेवीदार कर्जदार खातेदार बांधव उपस्थित होते यावेळी सुत्रसंचलन एस.पी.पुयड सर तर आभार व्ही.एन.जोगदंड यांनी मानले.

0 Comments