Header Ads Widget

पंतप्रधानाच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली ५०० झाडाचे वृक्षा रोपन

          माधव पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठवडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून भारतीय
जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

यावेळी विशेष मान्य वरांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जाती आश्रम शाळा लोहगाव येथे विविध प्रजातीतील एकूण ५०० झाडाचे वृक्षा रोपन करून देशाला शुभ संदेश देत अभिष्टचिंतन केले आहे 

नांदेड जिल्ह्याच्या लोहगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसा निमित्त वृक्षारोपण करते वेळी माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड शिवराज पाटील होटाळकर यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती आश्रम शाळा लोहगाव येथे विविध प्रजातीचे ५०० झाडे लावून अभिष्टचिंतन करण्यात आले आहे

यावेळी मा.माणिकराव लोहगावे भाजपा जिल्हा सरचिटणीस नांदेड दिलीपराव पांढरे शिवराज पाटील होटाळकर मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय नकाते मुख्याध्यापक कल्याण बापूराव पवार रुपेश पवार व सर्व दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळाच्या अंतर्गत सर्व कर्मचारी शिक्षक वृंद शाळेतील विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते

पंतप्रधानाच्या वाढदिवसानिमित्त नायगावात भाजपा पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली ५०० वृक्षाचे वृक्षाचे वृक्षा रोपन करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments