नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबड्याच्या जवाहरलाल नेहरू उच्च व माध्यमिक विद्यालयाचे अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षक नागोराव तिप्पलवाड ( एन टी सर ) यांचे चिरंजीव पवन नागोराव तिप्पलवाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा एस टी मार्फत प्रवर्गातून राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कर सहायक व मंत्रालय लिपीक महसूल सहायक दोन्ही पदी निवड झाली असल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
जिल्ह्याचा तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले व अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षक एमपी सर यांचा मुलगा लोकसेवा आयोगामार्फत एस टी प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला असल्याने पवन नागोराव तिप्पलवाड यांचा बरबडा नगरीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी कार्यासाठी समस्त गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील पवन नागोराव तिप्पल वाड या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी बरबडेकर, शिवाजीराव धर्माधिकारी बरबडेकर,माजी प्राचार्य व्यंकटराव सुरेवाड सर, बरबडा ग्रा.पं. सरपंच माधव कोलगाने, माजी सरपंच बालाजी मदेवाड, गणेश बडुरे , विश्वनाथ बडुरे सर्व सदस्य ग्रा.पं सदस्य बरबडा यांनी या निवडीबद्दल पवन तिप्पलवाड यांचे अभिनंदन केले

0 Comments