यमुनाबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा नायगाव (बा) तालूका नायगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक ५ सप्टेबर २०२३ रोजीे मार्गदर्शक प्राचार्य फाजगे के.व्ही यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका
सौ. शिराढोणकर पांडे एस बी तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंद पवार हे विचारमंचावर उपस्थित होते या वेळी प्रमुख वक्ते एस आर नांदुरकर उपस्थित होते.त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले आहे
विद्यार्थिनी कु. दिशा हंबर्डे, इशिता लोखंडे, मानसी हंबर्डे, दूर्वा हंबर्डे, ध्रुवांकुर मुगावकर, वैभवी शिरोळे ,प्रतीक्षा सांगवे, यांनी भाषण केले तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर सखोल असे मार्गदर्शन केले आहे
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ पांडे मॅडम यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या सर्व कार्याबद्दल माहिती दिली व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग सातवीतील विद्यार्थिनी *कु. वैभवी शिरोळे व अक्षरा शिंदे* यांनी केले आभार प्रदर्शन कोंडामंगल जी बी. यांनी केले.

0 Comments