Header Ads Widget

नायगाव पोलीस ठाण्याचे ट्राफिक पोलीस हवालदार शेख यांचा पो. नि. चिंचोलकर यांच्या वतीने सत्कार -

        माधव पवार
नायगाव पोलीस स्टेशन येथील बेशिस्त वाहतुकीवर, आडव्या तिडव्या लावलेल्या वाहणावर, मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती व कॉलेज परिसरात फिरणाऱ्या रोड रोमिंवो यांच्या वाहनाची कागदपत्रे तपासून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती

फक्त २१ दिवसांमध्ये त्यांनी एकूण ३६१ वाहनावर कारवाई करत १लाख ९२ हजार ५०० रुपयाचा दंड आकारला आहे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील रहदारीस अडथळा करणारे दुकानदार रोडवर आपले सामान लावणारे दुकानाच्या पाट्या लावणारे हात गाडीवाले रस्त्यात अडथळा करणारी वाहने यांच्यावर भारतीय दंड विधान कलम २८३ अन्वये  १५ गुन्हे दाखल करून कोर्टामध्ये खटले पाठवण्यात आले आहे 

ठाण्यात कार्यक्षेत्रात व अतिशय कमी दिवसां मध्ये तात्काळ जास्तीत जास्त कारवाई केल्या बद्दल नायगाव पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी करवाई केली आहे 

ट्राफिक पोलीस हवालदार शेख यांचा त्यांनी केलेल्या कारवाही बद्दल ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी विशेष सत्कार करून सन्मान केला आहे

नांदेड जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक यांच्याकडून पोलीस हवालदार शेख यांच्या कार्याबद्दल बक्षीस मिळण्यासाठी पो. नि. चिंचोलीकर यांनी शिफारस केली असून केवळ २१  दिवसात ३६१  वाहनावर कारवाही,१ लाख ९२ हजार ५०० रुपय दंड आय पी सी २८३ प्रमाणे१५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत 


Post a Comment

0 Comments