कै.नारायणराव भालेराव हायस्कूल स्नेहनगर नांदेड यांच्या वतीने कै.ॲड.एल बी देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजीत अंतर शालेय निबंध स्पर्धेत जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडाची कुमारी साक्षी श्रीपतराव जाधव हीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे
या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले साक्षी श्रीपतराव जाधव हिस रोख रक्कम ११०० रुपये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले
तिच्या या यशा बद्दल शाळेचे मुख्याध्यापक दिलीपराव धामधिकरी उपमुख्याध्यापक श्री बडूरे सर, पर्यवेक्षक फड शिंदे सर्व संचालक मंडळ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील बरबड्याच्या जवाहरलाल नेहरू विद्यालयाची विध्यार्थीनी साक्षी जाधवने निबंध स्पर्धेत २ क्रमांक पटकावला रोख रक्कम ११०० रुपये देऊन सन्मानित करण्यात आले आहे

0 Comments