नायगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कृष्णुर युनिट अंतर्गत असलेल्या रुई फिटर वरून
बळेगाव रुई बु वंजारवाडी सावरखेड येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या एल एल के व्हीचे विद्युत तार एका अज्ञात वाहनाने दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान वंजारवाडी फाट्यावर तोडल्यामुळे गेल्या १८ तासा पासून गावे अंधारात आहेत
या मार्गावरील सर्व गावे अंधारात असले तरी सदरच्या युनिटचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लाईन मनाला लाईन स्टॅन्ड करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून लाईनमन पांचाळ यांच्या अन्य कर्मचारी लाईन स्टँड करत आहे
तालुक्यातील कृष्णुर युनिट अंतर्गत असलेल्या गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या एल एल व्हीचे एका अज्ञात वाहनाने तार तोडून पसारा झाले आणि सदरची लाईन स्टॅन्ड करण्यासाठी लाईन मनाला कमालीची कसरत करावी लागत असली तरी रात्री पर्यत पूर्ण होईल आणि लाईन स्टँड होईल परंतु सदरचे वाहन कोणाचे ? असा प्रश्न चर्चेला जात आहे
शेतकऱ्यासह घरगुती मीटर धारकाचे नाते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीशी जुळलेले असल्यामुळे त्यांची लाईट सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठे परिश्रम घ्यावा लागत आहे
तरी शेतकऱ्यासह घरगुती मीटर धारकाकडे लाखो रुपयाची वसुली असताना सुद्धा त्यांना सोयी व सुविधा देण्यासाठी विद्युत कंपनी प्रयत्न करते या गंभीर बाबीचा विचार करून ग्राहकाकडे असलेले थकीत बिले भरून कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक अभियंता जाधव यांनी केले आले आहे

0 Comments