महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय गोंधळ पाहून मा. आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी प्रथम नांदेड जिल्हाच्या लोहा कंधार मतदार संघातून शेकडो कार्यकर्त्यासह तेलंगणा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची विराट जाहीर सभा आयोजित करून केसीआर पक्षात प्रवेश केला आहे
त्याच धर्तीवर आता राज्यात होत असलेले राजकीय नाटक लक्ष घेऊन अनेक लोक केसीआरचा मार्ग स्विकारणार असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
भारताच्या तेलंगणा राज्याचे पहिले व विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असून तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा ह्यासाठी त्यांनी अनेक वर्षे आंदोलन केले होते विद्यमान मुख्यमंत्री कल्वकुंतल चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला सोयी सुविधा मिळावेत म्हणून राज्यात विराट सभा घेतल्या आहेत
राज्यात मराठा समाजा बरोबर धनगर बांधवाच्या आरक्षणचा व कुणबी आणि एस टीचे प्रमाणपत्र सरसकट मिळावे म्हणून चक्का जाम आंदोलने अमरण उपोषण धरणे आंदोलन करण्यात येत असताना राज्यातील दळभद्री सरकार सदरच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पक्षात जाण्यासाठी व प्रवेश करण्यासाठी इच्छा प्रकट करण्याची तयारी ग्रामीण भागात दाखवित आहे

0 Comments