Header Ads Widget

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार पोलिसाच्या मदतीसाठी नांदेड मित्र स्वयंसेवकाची निर्मिती करणार पोलीस निरीक्षक चिंचोलकर -

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नव तरुणांना सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या वतीने आवाहन करण्यात येते आहे

नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ज्या तरुण वर्गाला पोलिसां सोबत काम करण्याची इच्छा असेल त्या तरुणानी पोलीस विभागाच्या मार्फत नांदेड मित्र संयम सेवक यांची नोंदणी व निर्मिती करण्यात येत आहे

पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सदरच्या तरुणांनी पुढे यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केले आहे

जिल्ह्यात काही दिवसातच धार्मिक उत्सव साजरे होणार असल्यामुळे यात गणेश उत्सव पोळा आधी सण साजरे होणार असून नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नवतरुण व सर्व समाजातील तरुणांनी पोलिसांच्या मदतीसाठी पुढे यावे त्यासाठी नायगाव पोलीस ठाण्यात दिनांक १ सप्टेंबर २०२३ पासून नोंदणी करण्यात येत आहे

सदरच्या नव तरुणांनी आपले स्वतःचे आधार कार्ड व ओळखपत्र पोलीस ठाण्यात संबंधित विभागाकडे द्यावे असे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सुचित केले आहे

पोलिस व जनता यांच्या मधील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी व जनते सोबत समन्वय ठेवण्यासाठी सदरच्या नव तरुण वर्गांची नांदेड मित्र स्वयंसेवक यांची नाव नोंदणी करण्यात येत आहे

सदरील तरुणांनी नायगावच्या पोलीस ठाण्यात आपले आधार कार्ड मोबाईल नंबर व आपला पत्ता सविस्तर देण्यात यावे संपूर्ण स्वयंसेवकाची नोंदणी झाल्याच्या नंतर त्यांना एमपीसीचे ज्ञान व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे ही चिंचोलकर यांनी सांगितले आहे 



Post a Comment

0 Comments