Header Ads Widget

नायगाव तालुक्याच्या रुई बु.येथून महिला पुरुषासह १०० भाविक पायी यात्रेच्या माध्यमातून शेगावाकडे रवाना -

         माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथील १२० महिला भाविकासह पुरुष भक्त मंडळी शेगावच्या देव दर्शनासाठी दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक  ९ वाजून ३० मिनिटांनी पायी यात्रेच्या माध्यमातून रवाना झाले असल्याने जवळपास दहा दिवस या भाविक भक्तांना चालावे लागणार आहे

नायगाव तालुक्यातील रुई बु येथील भाविक भक्त मंडळी वेगवेगळ्या देवस्थानासाठी व दर्शन घेण्यासाठी दरवर्षी महिला व पुरुष मंडळी जात असतात अशा भाविक भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी गावकरी मंडळी एकत्रितपणे येऊन देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पायी यात्रा सुखा समाधानी जावी म्हणून परमेश्वराला साकडे घालीत असतात हा एक रुई बु.येथे परमेश्वरी नियम आहे

तालुक्यातील रुई बु. हे गाव सांप्रदायिक भाविक भक्तांचे असल्यामुळे दरवर्षी तुळजापूर असो की जेजुरी असो अथवा मोठा महादेव असो की तिरुपती असो अशा देवाधिकाचे दर्शन घेण्यासाठी रुईच्या भाविकांत उत्सुकता असते तशाच पद्धतीने शेगावच्या देव दर्शन घेण्यासाठी गावातील अंदाजे १०० ते १२० महिला पुरुष भाविक भक्त पायी यात्रेत सहभाग घेऊन शेगावला रवाना झाले आहेत 

Post a Comment

0 Comments