मनुष्याच्या जीवनात सोळा संस्कार केल्या जातात त्यातील विवाह संस्कार सर्वात महत्त्वाचा आहे. काही चुकीच्या चाली रिती अंगीकारल्याने वैवाहिक जीवन वादग्रस्त ठरत आहे.
शास्त्राने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून विवाह वरील अनावश्यक खर्च टाळल्यास घरात वधूच्या रूपाने लक्ष्मी येईल ,हुंडा पद्धती बंद झाली पाहिजे,डिजे, अनावश्यक झगझगट, कर्कश पण बंद झाले की विवाह हा जिवनातील आनंदी क्षण म्हणून पाहता येईल,याच बरोबर निसर्गाच्या नियमाप्रमाणे वृक्ष संवर्धन करून पर्यावरण समतोल सांभाळून विषमुक्त शेती करणे काळाची गरज आहे
आणि हीच खरी राष्ट्रसेवा असे प्रतिपादन प.पु आबासाहेब मोरे यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना केले.
नायगाव येथील व्यंकटेश नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अनेक धार्मिक सामाजिक आयोजित करण्यात येतात रविवारी सकाळी आठ संयकाळी पाच या वेळेत सर्व जाती धर्मीय वधू वर परिचय मेळावा विवाह नोंदणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प.पु मोरे दादानी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना म्हणाले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र राज्यात, देशात, विदेशात चालतात या केंद्रात विस टक्के अध्यात्म तर ऐंशी सामाजिक उपक्रम राबवून अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहेत,
जिवनातील नैराश्य झाडून उपलब्ध साधनांच्या आधारे सुखी जीवन जगून बलशाली राष्ट्र निर्मातीचे स्वप्न या निमित्ताने पुर्ण करायाचे असल्याचे सांगितले, विवाह प्रसंगातील अनेक चुकीच्या पद्धती बंद करने गरजेचे आहे, स्त्रीभ्रूणहत्या थांबल्या पाहिजेत, सध्या निर्माण झालेल्या मुला मुलींच्या संख्येतील तफावत दूर करण्यासाठी जनजागृती करून सुसंस्कारी वधू वर या केंद्रात त्यांच्या नोंदी केल्या जातात.उपलब्द नोंदणी निसुर विनामूल्य विवाह लावल्या जातात असे ते म्हणाले.
दुसरा मुद्दा महत्वाचा शेतीचा आहे, सध्या निसर्गाच्या लहरी पणामुळे शेती संकटात आहे, तात्काळ आणि आधिकाच्या उत्पन्नाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने शेती करण्यासाठी सध्या सुरू आहे, आमच्या धर्म शास्त्राने शेती कडे वेगळ्या दृष्टीने पाहून तंत्रशुद्ध शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले.
परंतू आधुनिक शेती ही मानवी जिवनात विष घेऊन आली, अनेक नको ती रोग आमच्या पाठी मागे लागली आहेत.शेती जुन्या पध्दतीचे सेंद्रिय पद्धतीने केल्यास पिकवणारे, खाणारे रोग मुक्त जिवन जगु शकतात, गावरान भाजीपाले , रानमेवा यांच्या कडे आमचे लक्ष नाही, पशुसंवर्धन कडे लक्ष नाही,गायाच्या सेनात,मुत्रात तेतीस कोटी बाक्रटीया आहे,
गो पालन करा,बांधावर वृक्ष लावा,तनाचे उत्पन्न आपलाल मिळत यांचे अनेक दाखले प्रत्यक्षपणे आपल्या समोर स्टालच्या माध्यमातून उपलब्ध असल्याचे सांगितले.यावेळी जवळपास दीडशे वधूवरांच्या प्रत्यक्ष नोंदी संवाद घडवून आनला.
गुरू माऊलींच्या आगमन नंतर नायगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष मिनाताई सुरेश कल्याण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, सुधाकर पाटील शिंदे, शिवाजी कल्याण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी विविध स्टाल उभारून माहिती देण्यात आली, यावेळी मराठवाड्यातील, जिल्ह्यातील सेवा केंद्रांचे विविध प्रतिनिधी, स्थानिक सेवा समितीच्या वतीने महाप्रसाद करून कार्यक्रम यशस्वी पार पडला. फोटो.

0 Comments