Header Ads Widget

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेते मंडळीचा निषेध करण्याची वेळ मराठ्याना का ? आली -:-:-

       माधव पवार
राज्यात गेल्या २५ ते ३० वर्ष खाली छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब जावळे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रात लढा उभारला असून जिथे आण्णा साहेबाची सभा होत होती त्या ठिकाणी प्रशासन घायाळ होत होत होते मराठ्यांना आरक्षण मिळावे मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी आण्णा साहेबाची सभा नायगाव येथे घेतली होती 

परंतु राज्यात विचित्र चित्र निर्माण झाले असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाकडे राज्यातील कोणते ही सरकार ते आज पर्यंतच्या लक्ष दिले नाही उलट  दुर्लक्ष केले म्हणून त्यांचा निषेध करण्यात येत आहे

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब जावळे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात अनेक ठिकाणी मोठ मोठाल्या सभा घेतल्या होत्या त्याच धर्तीवर सध्याच्या परिस्थिती मध्ये महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतराली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास बसले होते

उपोषणाच्या स्थळी आंदोलकावर पोलिसांचा लाठी चार्ज ही करण्यात आला होता या घटनेचा तीव्र संताप महाराष्ट्रात मराठा समाजातून झाला सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नायगावच्या तहसील कार्यालयासमोर सतीश पाटील हिप्पर्गेकर व गजानन पाटील कदम यांनी उपोषणास बसले आहे

त्याच बरोबर वजीरगाव येथे हनमंत बालाजी पाटील ढगे यांनी ही उपोषणास बसले असताना त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्याला नांदेडच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments