नायगाव तालुक्यातील मनूर येथील ७०० शेतकरी आहेत त्या पैकी १०४ शेतकऱ्याचे सन २०२३ च्या गारपीट मध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते परंतु या गावचे तलाठी गावातील काही निवडक लोकांच्या सांगण्या वरून अनेक लोकांना ढावले असल्याचा आरोप शेतकऱ्यानी निवेदनात केला आहे
सदरील शेतकऱ्यांना तात्काळ गारपीटचे अनुदान मिळावे म्हणून नायगावच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे
तालुक्यातील मनुर येथील शेतकरी दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व उपविभागीय कार्यालय बिलोली येथे गारपिटचे अनुदान १७ सप्टेंबरच्या पूर्वी देण्यात यावे या मागणीसाठी जवळ पास ५९६ शेतकरी जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत
मनूर येथील शेतकरी ७०० असताना सुद्धा गावातील सरपंच प्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून तलाठी संदीप पवार यांनी १०४ लोकांनाच अनुदान मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे अहवाल सादर केला असल्याचा आरोप करण्यात आला एकूण ५९६ शेतकरी गारपीटच्या अनुदाना पासून वंचित असल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व उपविभागीय अधिकारी बिलोली सचिन गिरी तसेच नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी जास्तीचे प्रयत्न करावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे
मनूरच्या शेतकऱ्यांकडे प्रशासनाने जर दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही देण्यात आला असून सरपंच प्रतिनिधी व तलाठी संदीप पवार यांनी गावात कोणत्या ही शेतकऱ्याना कळू न देता परस्पर सदरचा आवाहाल शासनाकडे पाठविला असल्याचा आरोप करीत एकूण ५९६ शेतकरी अनुदाना पासून वंचित राहिले असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments