नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत पाहिले तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस जनतेच्या हितासाठी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कधी चालू करणार असा सवाल सदरील जनतेतून केला जात आहे
गेल्या स्वतंत्र्याच्या काळापासून काही गावांमध्ये शासनाच्या बसेस अद्याप पोहोचल्या नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी खेड्यापाड्यात बसेस चालू केल्या तर एका बाजूने शासनाचा नफा होईल आणि दुसऱ्या बाजूने जनतेची व विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय टळेल अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांनी बसेस चालू केल्या तर जनतेला शासनाच्या बसेसचा फायदा होईल असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
भारतीय स्वतंत्र्याच्या ७५ वर्षाच्या काळात नायगाव तालुक्यातील हिप्परगा रानसुगाव पळसगाव टाकळी ताकबीड गंगनबीड त्याच बरोबर वंजारवाडी चारवाडी परडवाडी निळेगव्हाण बरबडा वाडी वजीरगाव टाकळी रुई खुर्द नरंगल मांडणी आधी गावामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस गेलीच नसल्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदरच्या बसेस सोडण्यात याव्यात अशा पद्धतीची मागणी सदरच्या जनतेतून केल्या जात आहे

0 Comments