Header Ads Widget

नायगाव पोलीस स्टेशनची सेवा करणाऱ्या गायकवाड कुटुंबातील मातेचा ठाण्याच्या वतीने सत्कार - सन १९७८ पासून केली सेवा =

        माधव पवार
 नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी विविध सामाजिक उपकरणाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सन १९७८ पासून नायगाव पोलीस स्टेशनची सेवा करणाऱ्या गायकवाड कुटुंबातील एका वयोवृद्ध मातेचा पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार केला आहे 
पोलीस स्टेशन नायगाव येथे साफ सफाई स्वच्छता करणारे नायगाव पोलीस स्टेशमध्ये १९७८ पासून सतत सेवा देणारे गायकवाड कुटुंब यांचा नायगावचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या वतीने विशेष  सत्कार व सन्मान केला यावेळी फौजदार बाचावार उवस्थित होते 

येथील हनमंत गायकवाड यांचे वडील यांनी नायगाव पोलीस स्टेशनंला १९७८ साला पासून एकूण १६ रुपये पगारा पासून स्वच्छता कामास सुरुवात केली असल्यामुळे त्या कुटुंबाची दखल घेत नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  चिंचोलकर यांनी प्रथमच सदरील मातेसह मुलांचा यावेळी सत्कार केला आहे

पोलीस ठाण्यात त्यांच्या  पत्नीने १९८४ पासून काम केले होते सध्या मागील वर्षापासून हनमंत गायकवाड हे पोलीस स्टेशन मध्ये स्वच्छतेचे काम करीत आहे.

गायकवाड कुटुंबाने मागील ४५  वर्षापासून पोलीस स्टेशन नायगावची सेवा केल्या बद्दल त्यांच्या व कामा बद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा सत्कार केला असून सन १९७८ पासून नायगाव पोलीस स्टेशनची सेवा करणारे गायकवाड कुटुंबातील मातेचा ठाण्याच्या वतीने विशेष सत्कार केला आहे 

Post a Comment

0 Comments