नांदेड जिल्ह्याच्या मुखेड बिलोली लोहा उमरी कुंडलवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या पाच ही ठिकाणच्या निवडणुकी मध्ये विरोधी पक्षांला आस्मान दाखवून मित्र पक्षांचा झेंडा फडकवून दाखवू असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी नायगाव फास्टशी बोलताना सांगितले आहे
जिल्ह्याच्या पाच ही ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला सुरुवात झाली असल्यामुळे भाजपा पक्ष शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या गटाच्या नेतृत्वाखाली या मित्र पक्षाने एकत्रितपणे बिलोली उमरी मुखेड लोहा कुंडलवाडी या ठिकाणच्या निवडणुकी मध्ये विरोधी गटाचा समाचार चांगलाच घेण्यासाठी एकत्र निवडणूक लढवीत आहेत
मित्र पक्षांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या ताकतीने सदरच्या निवडणुका लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्ह्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव उर्फ ( माधवराव ) धर्माधिकारी यांनी जिल्ह्यातील सोळा तालुक्या पैकी १० तालुक्याचा महत्वाचा दौरा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या या बैठकात पक्षाच्या हितासाठी व पक्ष वाढीसाठी सकारात्मक चर्चा करण्यात आल्या आहेत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची पक्कड मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर चांगले सरसावले आहेत

0 Comments