Header Ads Widget

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची बदली नियमानुसार झाली ? नसल्यामुळे रद्द करावी जनसामान्याची मागणी -

        माधव पवार
नायगाव पोलीस स्टेशन येथून नुकतीच बदली होऊन लोहा पोलीस स्टेशनला गेलेले पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी केवळ २५ ते २६ दिवसाच्या कार्यकाळात दमदार कामगिरी केली आहे

अचानक नांदेड जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बदली केली त्यांच्या जाग्यावर कर्तव्यदक्ष महिला पोलीस निरीक्षक म्हणून वसुंधरा बोरगावकर मॅडम नायगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळणार आहेपोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी केवळ २५ ते २६ दिवसाच्या कार्यकाळात ठाणे प्रमुख म्हणून तथा पोलीस अधिकारी म्हणून कशी जबाबदारी असते जनतेसह नायगाव शहराला दाखवून दिले आहे
त्यांनी करत असलेल्या कार्याच्या संदर्भात कोणाची ही तक्रार वरिष्ठाकडे नसताना सुद्धा नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रशासकीय आदेशानुसार बदली केली का ? तोंडी अदेशाने बदली केली हा महत्त्वाचा प्रश्न जनतेला भेडसावत आहे

नायगाव पोलीस ठाण्याला दमदार पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची टुक्कार खोरावर व सडक छाप फिरणाऱ्यांना चांगलीच नजर होती व वचक बसली होती

नायगाव शहरात लावलेली शिस्त ही जनतेच्या हितासाठी महत्त्वाची ठरली होती त्याच पद्धतीने महिला पोलीस निरीक्षक बोरगावकर मॅडम यांनी ही अशाच पद्धतीची कारवाई चालू ठेवतील का ? अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे -

Post a Comment

0 Comments