नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क -
लोहा तालुक्यातील सुगाव येथे गेल्या ६१ वर्षापासून लाल मातीचा गणपती बनविला जातो .सामाजिक ऐक्य जोपासत यासाठी लागणारी लाल माती मुस्लिम समाजातील हुशेन साहेब शेख यांच्या वतीने चार किलोमीटर अंतरावरून घेऊन येण्याचं काम त्यांच्या परिवाराच्या वतीने मागील ६१ वर्षापासुन केल्या जाते
यावर्षी हबीब शेख हा आपल्या वडिलांच्या परंपरेनुसार लाल माती आणून देतो.लाल मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचं काम गावातील नामदेव लोखंडे, उत्तम येमुलवाड, शिवानंद पांचाळ यांच्या कलाकृतीतून करण्यात येते
अकरा दिवस सकाळ, संध्याकाळ अन्नदान बाहेर गावातील व गावातील भाविकांच्या वतीने करण्यात येते. संपूर्ण गावाला सकाळ व संध्याकाळ महाप्रसादाचा लाभ मिळत असतो. यासाठी बाहेर गावातील तसेच कर्नाटक, तेलंगणा राज्यातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात
गणेश मंडळास जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे, तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे, उस्माननगर पोलिस स्टेशन शासकीय पारितोषिक व इतर अनेक पारितोषिक मिळविण्याचा बहुमान या गणेश मंडळास मिळालेला आहे. गणेश मंडळाचे अध्यक्ष बालाजी महाराज चिंचाळे हे आहेत
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शामराव पा. जाधव व बालाजी तुकाराम पा. जाधव यांनी दिली

0 Comments