Header Ads Widget

नायगाव पोलीस ठाण्या बरोबर कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गणरायाच्या उत्सवामुळे ९ ते दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन -

         माधव पवार 
नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात श्री गणरायाच्या उत्सवाच्या निमित्ताने ९ ते १० दिवस दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी श्री गणेशाची खेड्यापाड्यात स्थापना करण्यात येणार असल्यामुळे सर्वत्र रोषनाई बरोबर आरती व गजर होणार आहे

नायगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्यासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी यांच्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावातील गणेश मंडळाना शांततेत गणेशउत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे 

तालुक्यातील नायागांव व कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत किती गावात एक गाव एक गणपती बसविण्यात आले यांची माहिती मिळाली नसली तरी या दोन्ही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांत एक पेक्षा जास्त गणरायाच्या स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असल्यामुळे बऱ्याच पैकी गावांत गणरायाच्या मंगल मूर्ती बसविण्यात येणार आहेत

नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण गावे ३५ ते ३६ गावे असल्यामुळे मोठया प्रमाणात श्री गणेशाच्या कार्यक्रमा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्याच बरोबर कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ४५ गावात सुद्धा बऱ्याच पैकी गणरायाच्या मंगल मूर्तीची स्थापना करण्यात आल्या असून या सदरच्या कार्यक्रमा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments