हिमायतनगर : नागोराव शिंदे -
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर या गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा या मागणीसाठी हिमायतनगर चे तहसीलदार आदित्य शेंडे यांना गावातील शेकडो ज्येष्ठ आणि कार्यकर्त्यानी निवेदन देऊन कळविले आहे
राज्यातले राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मोठी चाल ढकल करत असल्यामुळे मराठा समाजात प्रचंड तीव्र संताप व्यक्त केला जात असल्यामुळे गावा गावात आता सकल नारठा समाज सरकार विरोधात निषेध व्यक्त करीत आहे
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वतीने केंद्र सरकारने एक विशेष अधिवेशन घेत असून त्या अधिवेशनात सकल मराठा समाजाच्या रास्त मागण्या असल्यामुळे त्या सरकार ने सोडविल्या पाहिजेत अशा पद्धतीचे निवेदन पळसपूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातं म्हटले आहे
नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगरचे विशेष प्रतिनिधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पळसपूर येथील नागरिक म्हणाले की सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावेत अशी आमची रास्त व लोकशाही मार्गाने मागणी करत आहोत

0 Comments