राज्यातले राज्य सरकार मराठा समाजाचा अंत पाहत असल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारकडे आरक्षण द्यावे म्हणून मागण्या होत असताना सुद्धा सरकार चांगलेच चाल ढकल करत असल्याने व मराठ्यांची दिशाभूल करत आहे
सरकार आज घडीला मराठा समाजावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली असल्याने सदरच्या उपोषणा दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्राण गेला तरी चालेल परंतु उपोषण मागे घेणार नाही असा संताप जनक सवाल लोहा तालुक्यातील सुगाव येथे आमरण उपोषण करत असलेले ६५ वर्षीय उपोषण करता भगवान पाटील जाधव यांनी सरकारला इशारा दिला आहे
गेल्या स्वतंत्र्याच्या काळापासून मराठा समाजाच्या मुलासाठी शिक्षणात ही सवलत नसल्याने व नोकऱ्या नसल्याने सदरचे मुल मुली शिकून बेरोजगार आहेत त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून सवलती मेळाव्यात म्हणून मराठा समाज हा सरकारकडे हक्काचे आरक्षण देण्यात यावे म्हणून आंदोलने उपोषने लोकशाही मार्गाने काढत आहेत
परंतु सरकार कसल्याच प्रकारे मराठा समाजाकडे लक्ष देत नसल्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी सकल मराठा समाज हा राज्यात पेटून उठला असल्याने आमरण उपोषणे धरणे आंदोलने रास्ता रोको करीत असताना सुद्धा सरकारला कसल्याच प्रकारची आरक्षण देण्याची जाग येत नसल्याचा ही सवाल केला आहे
तालुक्यातील सुगाव येथे आमरण उपोषण कर्ते भगवान जाधव यांनी संताप व्यक्त करीत आपल्या शब्दातून सरकारला व राजकीय पुढार्यांना एक इशाराच दिला आहे

0 Comments