Header Ads Widget

पोलीस स्टेशन लोहा तर्फे शहरात विशेष मोहीम एका दिवसात एकूण ७ गुन्हे आणि ५४ खटले / केसेस दाखल पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची माहिती

        माधव पवार
पोलीस स्टेशन लोहा तर्फे शहरात अवैध धंदे, अवैध ट्राफिक,अवैद्य पार्किंग, अवैद्य हात गाडी,अवैद्य माल ठेवणारे दुकानदार,सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणारे यांच्या वर विशेष मोहिमेत कारवाही करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिला आहे 
 
पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी यावेळी लोहा येथे अवैधपणे मटका/जुगार चालविणाऱ्या दोघांवर पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे कारवाई करून ०२ गुन्हे दाखल केले असल्यामुळे चांगलेच धाबे दणावले आहे

लोहा शहरात तसेच अवैद्यपणे दारू विकणाऱ्या दिनेश राठोड लोहा व मुरलीधर पवार पार्डी यांच्यावर छापा टाकून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे २ गुन्हे दाखल केले आहेत
 
पोलिसांनी या दरम्यान वारंवार सांगून ही तंबी देऊन ही ज्यांनी आपले हातगाडे, दुकान रोडवर लावले व ज्यामुळे येणारे जाणारे सामान्य माणूस वाहने यांना अडथळा निर्माण होऊन त्रास होत होता अशा व्यक्तीवर  भारतीय दंड विधान १९६० कलम २८३ प्रमाणे०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत 

 तर ज्यांनी आपल्या ताब्यातील दुकानाचा माल नलिच्या अलीकडे सार्वजनिक जागेत अडथळा होईल अशा पद्धतीने धोकादायकरीत्या ठेवला आणि अडचण निर्माण केली अश्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१  कलम १०२/११७ प्रमाणे २१ केसेस दाखल केल्या असून याबाबत खटला कोर्टात पाठवण्यात येणार आहे.

 तसेच आपल्या ताब्यातील वाहने रोडवर अस्ताव्यस्त  ठेवून रहदारीस अडचण करणारे वाहन चालक ट्रिपल सीट वाहन चालविणारे रॉंग साईड वाहन उभे करणारे रॉंग साईड वाहन चालविणारे विना नंबर वाहन चालविणारे यांच्या वाहनाची चेकिंग करून मोटार वाहन कायदा १९८८ प्रमाणे २३ केसेस दाखल करून १०.७०० रुपयाचा दंड आकरण्यात आला आहे

 तसेच सार्वजनिक ठिकाणी,क्लासेस शाळा या ठिकाणी विनाकारण रोड फिरणारे, रोडवर गैरवर्तणूक करणारे रोड रोमिंयो, भाई दादा बॉस यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११०,११२, ११७ प्रमाणे १०  केसेस दाखल केल्या आहेत.

 सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक हालसे, पोलीस अंमलदार माधव डफडे, वसंत कोठारे, वामन राठोड व गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी केली.

Post a Comment

0 Comments