Header Ads Widget

कृष्णूर ते बरबडा पुलाच्या बांधकामाची गती मात्र पावसाची आडकाठी गुत्तेदार कामात परेशान तर जनतेची रस्त्यामुळे बेहाल !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर ते बरबडा अंतर्गत करण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम उन्हाळ्यापासून गतिमान करण्यात येत असले तरी व सध्याच्या परिस्थिती मध्ये पावसाळ्याचे असल्यामुळे सदर बांधकामासाठी नामांकित गुत्तेदार नामदेव पाटील यांची यंत्रणा कामावर असून ही पावसाच्या आडकाठीमुळे सदरच्या बांधकामाला वेळ लागत असला तरी गुत्तेदाराची यंत्रणा कामावरच आहे

तालुक्यातील कृष्णूर ते बरबडा रस्त्याच्या पुलाचे काम सदरील पावसामुळे होत नसल्याने कुठे दाराचे यंत्रणा एका बाजूने परेशान असली तरी दुसऱ्या बाजूने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची चिखलमय रस्त्यामुळे वाहन धारकासह जनतेची बेहाल होताना दिसून येत आहे

बरबडा ते कृष्णूर हा रस्ता या भागातील नागरिकांना व जनतेला जाण्या व येण्यासाठी सोपा व सरळ असल्यामुळे सदरील कामाचे गुत्तेदार नामदेव पाटील यांनी उन्हाळ्या मध्ये कामाची गती वाढविली होती त्यानंतर पावसाळ्याला सुरुवात झाल्याच्या नंतर गुत्तेदारानी जलद गतीने काम करण्याचा प्रयत्न केला परंतु पावसाच्या अडकाठी मुळे सदरचे काम रेंगाळत गेले असले तरी गुत्तेदाराची यंत्रणा कामावरच असल्याचे दिसून येत आहे 




Post a Comment

0 Comments