नायगाव शहरात गणेश उत्सवाच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी दिली असून शहरात सदरच्या उत्सवा दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यांची दक्षता पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे
सदरचा उत्सव अतिशय शांततेत पार पडावा म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून मोठे प्रयत्न केला जात आहेत
पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्यासह तीन पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनचे २० पोलीस कर्मचारी होमगार्ड ३० प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई १५ एसआरपीएफचे एक पलटून असा पोलीस फोर्स गणेश विसर्जनाच्या दिवसी लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुट्टे यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे
नायगाव शहरातील व ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावात श्री गणेशाचे शांततेत विसर्जन होण्यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असून ज्या ठिकाणी श्री गणरायाचे विसर्जन करते वेळी त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याने व सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे श्री गणेशाचे विसर्जनाच्या कार्यकाळात छोट्या मोठ्या मुलांना पाण्याच्या ठिकाणी येऊ दिले जाणार नाही अशी ही पो.नि. गुट्टे यांनी माहिती दिली आहे

0 Comments