राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ज्वालांत असल्यामुळे राज्य सरकारने उपोषण कर्त्यांना एका महिन्याच्या वेळ मागितला असल्यामुळे सदरचे उपोषण मागे घेण्यात आले असले तरी सध्याच्या परिस्थिती मध्ये सकल मराठा समाजाने साखळी धरणे आंदोलन करीत आहेत
सरकारने दिलेल्या आश्वासना नुसार एका महिन्यात सदरचे आरक्षण अपेक्षित असून सरकारने जर मागे पुढे करण्याचा प्रयत्न केल्यास येणाऱ्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका मात्र सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यासाठी डोकेदुखी ? ठरणार आहे
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतराली सराटी येथे मनोज जरांचे पाटील यांच्या अमरण उपोषणा व सतीश पाटील कदम व गजानन पाटील कदम आणि हणमंत ढगे यांच्या उपोषना दरम्यान सकल मराठा समाजात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेकांनी जाहीर पाठिंबा दाखवीत तीव्र संताप व्यक्त केला आहे
सकल मराठा समाजाच्या उपोषना कार्यकाळात काही ठिकाणी होत असलेल्या मंत्री व संत्र्याच्या सभा रद्द करण्यात आल्या असल्या तरी राज्यातल्या राजकीय नेत्यासाठी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोकेदुखी ठरणार ? आहेत हे मात्र निश्चित आहे

0 Comments