Header Ads Widget

शासनाच्या ध्येय धोरणानुसार एक गाव एक गणपतीची संकल्पना अतिशय महत्त्वाची तहसीलदार मंजुषाताई भगत -

        माधव पवार
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी काही दिवसात शहरी भागासह ग्रामीण भागात श्री गणरायाचे मोठ्या थाटात वाजत गाजत आगमन होणार आहे

नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ८९ गावात शासनाच्या ध्येय धोरणानुसार गावातील व खेड्या पाड्यात सुज्ञान नागरिकांनी एक गाव एक गणपतीची संकल्पना करून गणपती बसविले पाहिजे असे मत नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितल्या आहे

कोणती ही नवीन गोष्ट कामे सुरू करण्याच्या सर्व प्रथम श्री गणरायाची पूजा केली जाते  भगवान गणेश अडथळे दूर करतात आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करतात भगवान गणेशाचे मोठे हत्तीचे डोके शहाणपण समजूत दारपणा आणि भेदभाव करणारी बुद्धी यांचे प्रतीक आहे

मानव धर्मातील जिवनात परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी एक गाव एक गणपतीची  स्थापना करण्याची अत्यंत गरज असल्याचे तहसीलदार भगत यांनी सांगितले आहे

महाराष्ट्रासह ग्रामीण भागात घरगुती सार्वजनिक गणपतीं बरोबरच ‘एक गाव एक गणपती’च्या संख्येत ही झपाटय़ाने वाढ झाली असली तरी अनेक खेड्या पाड्यात दरवर्षी साधारणत: घरगुती व सार्वजनिक अशा राज्यात अंदाजे २८ ते ३० लाख गणपतींची प्रतिष्ठापना होतच असते परंतु तसे न करता गावकऱ्यानी एक गाव एक गणपती बसविने आवश्यक आहे 

ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार व जेष्ठ नागरिकानी एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे ही महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी म्हणाल्या आहे 


Post a Comment

0 Comments