Header Ads Widget

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी बाबासाहेब हंबर्डे हुस्सेकर यांची निवड -

        माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षाचे एकनिष्ठ पणे काम करणारे तालुक्यातील हुस्सा येथील मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले जन सामान्य माणसाला सोबत घेऊन चालणारे व पक्षासाठी प्रामाणिक पणे काम करत असलेले बाबासाहेब हंबर्डे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे

तालुक्यातील भाजपा पक्षाची फळी मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्ह्य सरचिटणीस बाबासाहेब हंबर्डे यांनी आमदार राजेश पवार यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता गेल्या अनेक वर्षा पासून भाजपाचे काम चांगल्या प्रकारे करीत आहेत

बाबासाहेब हंबर्डे यांनी असलेल्या कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली असल्यामुळे त्यांची नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

हुस्सा नगरीचे दमदार नेतृत्व बाबासाहेब हंबर्डे यांची आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणूकीचा अनुषंगाने हंबर्डे यांची निवड केल्याचे मानले जाते खरे तर आमदार राजेश पवार यांचे ते अतिशय निकटचे संबंध असल्यामुळे भाजपा पक्षाने त्यांना जिल्हा सरचिटणीस पदावर पर्यत पोहचले असा मनमिळाऊ व्यक्तिमत्वाची जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments