सन १९९५ ते ९६ सालापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून छावा संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागण्याचे अनेक वेळा निवेदन देण्यात आले होते परंतु राज्यातले सरकार कोणत्या ही पक्षाचे असो त्या सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे आज पर्यंतच्या काळात लक्ष दिले नसल्यामुळे मराठा समाज आज घडीला आरक्षणा पासून वंचित राहावे लागत आहेभारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करत आहेत
नायगाव तालुक्यातील हिप्परगा सतीश कदम व गजानन कदम यांनी नायागांव तहसील कार्यालया समोर अमरण उपोषणास बसले होते त्याच बरोबर वजीरगाव येथील हणमंत पाटील ढगे यांनी उपोषण केले त्यांच्या उपोषण मागे घेतल्याच्या नंतर आता साखळी उपोषण करण्यात येत आहे
त्या उपोषण कर्त्याच्या भेट मा. शिवराज पाटील होटाळकर घेत आहेत यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्यासह नायागांवच्या तहसीलदार मंजुषा भगत त्याच बरोबर रणजित देशमुख यावेळी उपस्थित होते यावेळी मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून सदरच्या भेटी घेत आहोत असे यावेळी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना होटाळकर यांनी सांगितले आहे
राज्यातील मराठा समाज हा मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण करीत आहेत त्या आमरण उपोषण करणाऱ्या मराठ्यांना कुठे तरी आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे असा सरकारने विचार व प्रश्न डोळ्या समोर ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले पाहिजे हा मराठ्यांचा उपोषण करण्या मागचा मूळ हेतू आहे
मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले असले तरी सकल मराठा समाज साखळी उपोषणे करत असल्यामुळे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी त्यांच्या भेटी घेत आहेत
देशाला स्वतंत्र मिळवून जवळ पास ७० ते ७५ वर्षे झाले परंतु आज पर्यंतच्या काळात मराठा समाजाच्या मुलांचा विचार कोणत्या सरकारने आज पर्यंतच्या काळात केला नसल्यामुळे मराठा समाजाच्या मुलाना व मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकऱ्या पासून वंचित राहावे लागत आहे
लाखो रुपये खर्च करून उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठी समाजाच्या मुलांना घ्यावे लागत असून जर सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत विचार करून तात्काळ आरक्षण दिले तर मराठा समाजाचा बनलेला गंभीर प्रश्न सुटेल असे ही मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी बोलून दाखवले आहे

0 Comments