Header Ads Widget

लोहा येथील एकाने घटनेचा व्हिडिओ त्याचे मोबाईलच्या कॅमेरे मध्ये चित्रीकरण करून केला आत्महत्याचा प्रयत्न - गुन्हा दाखल - पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची माहिती -

         माधव पवार
लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहरा पासून १ किलोमीटर अंतरावर पूर्वेस असलेल्या आरोपीच्या राहत्या घरी घरातील पंख्याला गळपास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून सदरचा कार्यकर्ता हा एका राजकीय पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे

सदरच्या घटने पूर्वी सदरच्या व्यक्तीने घडलेल्या घटनेचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलच्या कॅमेरे मध्ये चित्रीकरण करून आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दिली असून सदर व्यक्ती हा एका नामांकित पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे 

सदरील घटनेत पोलीस स्टेशन लोहा येथे गुरन व कलम गुरन -गुरन. २२३/ २०२३ कलम ३०९  भादवी प्रमाणे या प्रकरणातील फिर्यादी-सदाशिव पांडुरंग जामकर वय ५० वर्ष व्यवसाय नोकरी पोहेका २३२३ नेमणूक पोलीस ठाणे लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड  यांनी सदर घटनेतील आरोपीचे नाव व पत्ता रमेश गोविंदराव माळी राहणार लोहा असे आहे 

लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडलेली तारीख १८ सप्टेंबर २०२३ रोजीच्या ३ वाजताच्या  सुमारास आरोपीच्या राहते घरी लोहा येथील पूर्वेस १ कि.मी अंतरावर घडली आहे

या प्रकारणात ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासीक अंमलदार फौजदार हलासे यांच्यासह पी एस ओ पोहेका २१११ तिडके पोलीस यांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला व अगोदरचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचे लोहा पोलिसांनी सांगितले आहे

सदरच्या आरोपीने हातात एक सिगारेट घेऊन ही अखेरची पीत आहे मी आत्महत्या करत आहे असे म्हणून त्याचे हातात दोरी घेऊन ती गळ्यामध्ये लटकवून ती दोरी घरातील फॅनला अडकून सदरचा व्हिडिओ त्याचे मोबाईलच्या कॅमेरे मध्ये चित्रीकरण करून आत्महत्याचा प्रयत्न केला आहे 








Post a Comment

0 Comments