Header Ads Widget

राज्यासह नांदेड जिल्ह्यात प्रथमच लोहा पोलिस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी गुंड्या काढून फिरणाऱ्यावर केली कारवाई -

        माधव पवार
राज्यात कोणी न्यायालयात शर्टाचे कप व गुंड्या काढून फिरताना कारवाई झाल्याचे अनेक वेळा ऐकले परंतु लोह पोलिस ठाण्यात शर्टच्या गुंड्या काढून फिरणाऱ्यावर पोलीस निरीक्षण ओमाकांत चिंचोलकर यांनी चौघावर कारवाई करण्यात आली असल्यामुळे राज्यातील व नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्यातील ही पहिलीच कारवाई करण्यात आल्यामुळे आता यापुढे कोणत्या पोलीस ठाण्यात जाताना व येताना लोकांना सावधान राहावे लागणार आहे

लोहा पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सदरच्या पोलीस ठाण्यात शर्टच्या गुंड्या मोकळ्या करून मोकाट ईकडून तिकडे फिरणाऱ्या ४ जणावर मुंबई पोलीस अधिनियम ११०/११७ प्रमाणे चार केसेस दाखल केल्याची माहिती पो.नि. चिंचोलकर यांनी दिली आहे 

सार्वजनिक ठिकाणी कोण्या प्रकारे वर्तन करावे याबाबत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मध्ये सांगितले असून 
पोलीस स्टेशन हे एक सार्वजनिक आणि शिस्तीचे ठिकाण असल्यामुळे पोलीस स्टेशन मध्येच आपल्या शर्टाच्या गुंड्या मोकळ्या ठेवून असभ्य वर्तन करणाऱ्या लोकांवर १८ सप्टेंबर २०२३ रोजी लोहा पोलीस स्टेशन तर्फे कारवाई करण्यात आल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे 

लोहा पोलीस स्टेशन येथे विविध कामा निमित्ताने किंवा बोलावल्या म्हणून आलेल्या चार लोकांनी त्यांच्या शर्टाच्या गुंड्या मोकळ्या ठेवून पोलीस स्टेशन मध्ये असभ्यपणे वर्तणूक केल्या बद्दल यांच्या वर ही कारवाही करण्यात आली असल्याची माहिती सिंघम पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले आहे 



Post a Comment

0 Comments