Header Ads Widget

जुन्या न्यायालयाच्या परिसरात जुवा खेळत असणाऱ्या वर दबंग पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या पथकाचा छापा दहा आरोपीला दिला झटका - लोहा पोलिसाची कामगिरी -

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या लोह पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जुन्या न्यायालयाच्या परिसरात पत्त्याचा डाव खेळत असलेल्या जुगाऱ्यावर लोह पोलिस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या पथकाने सदरच्या आड्यावर छापा टाकून दहा आरोपीला ताब्यात घेऊन जेरबंद केले असल्याची माहिती लोहा पोलिसांनी दिली आहे

लोहा पोलिसांनी मारलेल्या छाप्यात सदरची कामगिरी बजावणारे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चन्ना यांच्यासाह फौजदार हालसे,सपोऊपनि सूर्यवंशी, केंद्रे, पोहेका.किरपने, लाडेकर, पोका शेळके, इजुलकंठे, मेकलवाड, चालक मुळके, होमगार्ड कदम, क्षीरसागर यांनी केली आहे.

१ लाख १४ हजार १७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आली असून लोहा पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा अवैध मटका जुगारावर कारवाई केली आहे

सदरच्या धाडीमध्ये एकूण दहा आरोपी जुगार खेळताना मिळून आले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून सदर ठिकाणी जुगारासाठी वापरलेले पैसे जुगार खेळण्याचे साहित्य पत्ते सहा मोबाईल एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे

लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या छापे मारीत १० आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नुकताच मटका अड्ड्यावर लोहा पोलिसांनी कारवाई करून मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता

लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी अवैध धंदे करणाऱ्यावर धाडीवर धाडी मारत असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणावले असल्याची चर्चा पाहुयास व ऐकायला मिळत आहे 




Post a Comment

0 Comments