नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने घंटागाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्यासह नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे यांच्या उपस्थितीत सदरच्या घंटागाडीचे भव्य उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती गावचे सरपंच माधव कोलगाणे यांनी दिली आहेनायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या घंटागाडीच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी हे अध्यक्ष होते
बरबडा येथील आयोजित कार्यक्रमाच्या विचार मंचावर नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एल आर वाजे यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वानोडे स्वच्छता तालुका समन्वयक इंदुरीकर आधीची उपस्थिती यावेळी होती
तालुक्यातील बरबडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने घंटागाडीच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वाजे यांचा विशेष सत्कार गावचे विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे यांच्यासह गावच्या महिला उपसरपंच छायाताई दिलीपराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला आहे
बरबडा गाव हे १४ ते १५ हजार लोकांची लोक वस्ती असल्यामुळे गावचा विकास करण्यासाठी मोठ्या तळमळीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गावचे विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे व महिला उपसरपंच छायाताई दिलीपराव धर्माधिकारी व सर्व ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य गावचा विकास करण्यासाठी एकजुटीने काम करीत आहेत

0 Comments